जेव्हा आपण पर्यावरणवाद्यांविषयी बोलतो तेव्हा चिपको चळवळीचे नेते निसर्गऋषी सुंदरलाल बहुगुणा यांचा उल्लेख केला जातो.ते गांधींच्या तत्त्वांचे जबरदस्त अनुयायी होते.

पर्यावरणाचे रक्षण करणे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.

सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म ९ जानेवारी १९२७ रोजी  उत्तराखंडच्या टिहरी येथे झाला.ब्रिटीश काळात अहिंसेचा प्रसार करणारे श्री सुमन हे त्यांचे मार्गदर्शक होते.त्यांच्या नेतृत्वाखाली वयाच्या तेराव्या वर्षी सामाजिक कार्याला सुरुवात केली.  

त्यांना महात्मा गांधींनी प्रेरित केले.महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाचे अनुयायी देखील होते.हिमालयातील पर्यावरणाची होणारी वारेमाप हानी आणि ग्रामीण भागात होणाऱ्या परिणामामुळे ते पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करू लागले.ते डोंगर आणि जंगलात ४७०० किमी फिरत राहिले.त्यांनी दारूविरोधी मोहीम सुरू केली त्यांनी  महात्मा गांधी यांच्यासारखा अस्पृश्यतेविरूद्धही लढा दिला.

चिपको चळवळी मध्ये योगदान

उत्तर प्रदेश भागात गडवाल या ठिकाणी जंगल कंत्राटदाराकडून बेसुमार वृक्षतोड होत होती.या जंगल तोडीला विरोधासाठी त्यांनी १९७४ मध्ये चिपको चळवळीला सुरुवात केली.कंत्राटदार झाडे तोडत असताना ते झाडांना चिकटून उभे राहयचे.

ते नेहमी सांगत आम्ही आमच्या हक्कांसाठी उभे आहोत पण झाडांना आवाज नाही.जर झाडांना त्यांचा आवाज असता तर त्यांनी सुध्दा प्रतिकार केला असता.बहुगुणा यांनी गावोगाव या आंदोलनाविषयी प्रबोधन केले.

चळवळी दरम्यान त्यांनी ‘ईकॉलॉजी इज पर्मंनंट इकॉनॉमी’ हे घोषवाक्य तयार केले.याचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले.ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घेतला.अखेर याची दखल शासन स्तरावर घेण्यात आली.     

बहुगुणा यांनी टिहरी धरणाच्या प्रकल्पाच्या विरोधात होते.कारण त्यामुळे डोंगररांग तसेच जंगलांना हानिकारक होते.त्यांनी नेहमीच डोंगराळ लोक आणि त्यांच्या हिताबद्दल विचार केला.नद्यांवर प्रकल्प बांधण्यामुळे लोकांचे जीवनमान उध्वस्त होईल.विध्वंसक कार्यांमुळे होणारे विस्थापन या कल्पनेच्या विरोधात बहुगुणा कडकपणे होते.

पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार केला नाही.बहुगुणा गांधींच्या तत्त्वांचे अनुयायी असल्याने त्यांनी सत्याग्रह करण्याचे ठरवले सन १९९५ मध्ये त्यांनी ४५ दिवसाचे उपोषण केले. 

बहुगुणा यांचे साहित्यिक योगदान 

सुंदरलाल बहुगुणा यांनी पुढील पुस्तके लिहिली आहेत -

१.धरती की पुकार

२.ईकॉलॉजी इज पर्मंनंट इकॉनॉमी

३.भू प्रयोगमे बुनियादि परिवर्तन की ओर

४.इंडियाज एन्व्हायर्नमेंट

बहुगुणा यांना मिळालेले पुरस्कार 

१.जमनालाल बजाज पुरस्कार (१९८६)

२.पद्म विभूषण (२००९)

बहुगुणा नेहमी सांगत ज्याप्रमाणे लोक आपले खजिना सुरक्षित ठेवतात,त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या राहत्या वातावरणाचे रक्षण केले पाहिजे.सुंदरलाल बहुगुणा यांनी नेहमीच डोंगराळ लोकांच्या हक्कासाठी संघर्ष केला आहे.पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे आणि वृक्ष तोडू नये यासाठी त्यांनी नेहमीच समर्थन दिले. 

आजच्या जगात,असे लोक फार कमी आहेत,जे पुढे येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलतात.सुंदरलाल बहुगुणा हे एक दुर्मिळ रत्न होते.नैसर्गिक साधने हीच आपल्या जीवनाचा आधार आहेत हे सांगणारे निसर्गऋषी बहुगुणा यांनी २१ मे २०२१ रोजी जगाचा निरोप घेतला.