डिजिटल स्वाक्षरी हे एक असे तंत्रज्ञान आहे जे संदेशाची सत्यता आणि अखंडता पडताळणी करण्यासाठी वापरली जाते.इ-स्वाक्षरी हा एक इलेक्ट्रॉनिक प्रकार आहे संदेशवहन होताना सुरक्षा फार महत्वाची असते.संदेशाची गोपनीयता,प्रमाणीकरण,अखंडता आणि अस्वीकार हे सुरक्षेचे चार पैलू आहेत. 

डिजिटल स्वाक्षरीचे अनेक फायदे आहेत जसे कि सुरक्षा,कार्यक्षमता,कायदेशीर वैधता आणि खर्च व वेळेमध्ये बचत.फार पूर्वीपासून दस्तऐवज यावरती स्वाक्षरी करून दस्तऐवजाची मालकी सिध्द करता येत आहे.स्वाक्षरी हस्तलिखित आणि हाताच्या बोटाची ठसे याद्वारे करता येते.हि स्वाक्षरी करण्याची पद्धत पारंपारिक आहे.डिजिटल तंत्रज्ञाचा वापर हल्ली होत असल्याने डिजिटल दस्तऐवजावर डिजिटल स्वाक्षरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दस्तऐवजावर सही करणे हि डिजिटल स्वाक्षरीमागील मूळ कल्पना आहे.जेव्हा आपन एखादे दस्तऐवज इलेक्ट्रॉनिकरित्या पाठवितो तेव्हा दस्तवेजवर स्वाक्षरी देखील करता येते.


डिजिटल स्वाक्षरीत दस्तऐवजावर सही करण्यासाठी सार्वजनिक की (public key) तंत्र वापरले जाते.याला क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान म्हणतात  यामध्ये सार्वजनिक की(public key) आणि खाजगी कीच्या(private key) यांची कामे वेगवेगळी आहेत.

एखादा व्यक्ती संदेश पाठवत असेल तर एक खाजगी की वापरतो तर संदेश प्राप्तकर्ता संदेश डीक्रिप्ट करण्यासाठी पाठवणार्याची  सार्वजनिक की वापरतो.डिजिटल स्वाक्षरीमध्ये खासगी की एनक्रिप्शनसाठी वापरली जाते तर सार्वजनिक की डीक्रिप्शनसाठी वापरली जाते.

खालील  बाबी साध्य करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी वापरली जाते.

अखंडता:डिजिटल स्वाक्षरी संदेशाची अखंडता जपत असते  कारण,जर कोणताही अयोग्य प्रकार संदेश देवाण घेवाण मध्ये घडत असेल म्हणजेच एखाद्या संदेशास अडवले आणि अंशतः किंवा पूर्णपणे बदलले तर संदेश डिक्रिप्टेड होणार नाही.

संदेशाची तपासणी करण्यासाठी हॅश पध्दत वापरली जाते.हॅश फंक्शन व्हेरिएबल-लांबी संदेशावरून निश्चित-आकार तयार करतो.

वापरलेली दोन सर्वात सामान्य हॅश फंक्शन्स:एमडी 5 (मेसेज डायजेस्ट 5) आणि एसएचए -1 (सिक्युर हॅश अल्गोरिदम 1).प्रथम एक 120-बिट डायजेस्ट तयार करतो तर दुसरा एक 160-बिट डायजेस्ट तयार करतो.

सुरक्षेची खात्री करण्यासाठी पुढील घटकाची नोंद केली आहे.

संदेशाची लघु आवृत्ती (डायजेस्ट) हॅश फंक्शन वापरून तयार केली जाते.
डायजेस्ट प्रेषकाची खासगी की वापरुन कूटबद्ध केली जाते.डायजेस्ट एन्क्रिप्टेड झाल्यानंतर एन्क्रिप्टेड डायजेस्ट मूळ संदेशाशी संलग्न करुन प्राप्तकर्त्यास पाठविला जातो.

प्राप्तकर्त्यास मूळ संदेश प्राप्त होतो आणि एनक्रिप्टेड डायजेस्ट प्राप्त होतो.प्राप्तकर्ता द्वितीय डायजेस्ट तयार करण्यासाठी मूळ संदेशावरील हॅश फंक्शनची अंमलबजावणी करतो आणि प्रेषकांची सार्वजनिक की वापरुन प्राप्त झालेल्या संदेश डीक्रिप्ट होतो.