कोरोना हा एक विषाणू आहे.या विषाणूचे एक मोठे कुटुंब आहे.हा एक संसर्गजन्य रोग आहे.ज्यामुळे प्राणी किंवा मानवांमध्ये आजार उद्भवू शकतात.कोरोना हा विषाणू पाश्चात देशात सापडला असून तो सर्वत्र पसरत आहे.

कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप,थकवा आणि कोरडा खोकला आहे.काही लोकांना संसर्ग होतो पण कोणतीही लक्षणे दिसून येत नाही तो एक सौम्य प्रकार असतो.

कोरोना या विषाणूमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो वृद्ध लोक,आणि उच्च रक्तदाब यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेले तसेच हृदयाची समस्या किंवा मधुमेह असलेल्यांना  गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते.

कोरोनाचा प्रसार कसा होतो ते पाहूया
 
हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत थुंकी वाटे पसरतो म्हणजेच खोकला बाहेर पडतो तेव्हां हा विषाणू पृष्ठभागावर सुद्धा अस्तित्व निर्माण करतो त्यानंतर इतर लोक विषाणूच्या संपर्कात येतात जसे कि कपडे,बसण्याची जागा,वस्तू किंवा पृष्ठभाग.आपल्या हाताद्वारे नाक,तोंड याला स्पर्श केल्यानंतर श्वास घेतेवेळी तो शरीरात प्रवेश करतो.

स्वत: चे रक्षण करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे.

 

 
अल्कोहोलबेसने नियमित आणि पूर्णपणे आपले हात स्वच्छ करणे गरजेचे आहे.साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच कोरोना विषाणू संक्रमित झालेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवणे गरजेचे आहे.दोन व्यक्ती मधील कमीत कमी अंतर तीन फूट असणे गरजेचे आहे.

जर एखादी व्यक्ती खोकत किंवा शिंकत असेल तर तेव्हा ते लहान द्रव फवारतात त्यांच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणारे थेंब असू शकतात.कदाचित हाताचा स्पर्श थुंकिला लागू शकतो.एकदा दूषित झालेला हात आपल्या डोळ्यामध्ये विषाणूचे हस्तांतरण करू शकतो,नाक किंवा तोंड यामधून विषाणू व्यक्तीच्या  शरीरात प्रवेश करू शकतो आणि व्यक्ती यामुळे संक्रमित होते. 

एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असल्यास घरी राहणे गरजेचे आहे ताप असल्यास, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.यावेळी स्थानिक आरोग्य प्राधिकरणाच्या निर्देशांचे अनुसरण करणे गरजेचे आहे.इतरांशी संपर्क टाळणे.प्रवास टाळणे तसेच गर्दीपासून लांब राहणे गरजेचे आहे

 
मास्क वापरणे,आजूबाजूचा परिसर विषानुमुक्त करणे गरजेचे आहे.पृष्ठभागांवर विषाणू  किती काळ  टिकतो हे निश्चित नाही.विषाणूचे टिकणे वातावरणाच्या बदलावर अवलंबून आहे.

शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवणे तसेच आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचना पाळून कोरोना विषाणू वरती नियंत्रण आणता येऊ शकते.