आपण आपली माहिती संकेतस्थळावरती देत असतो.बरेच संकेतस्थळे ग्राहकाची खाते तयार करण्यासाठी माहिती मागत असतात परंतु ती माहिती सुरक्षित असणे गरजेचे असते अन्यथा त्रयस्त माध्यम गोपनीय माहिती वापरू शकते त्यासाठी माहिती घेणारी संकेतस्थळे SSLप्रमाणपत्राचा वापर करतात.SSL प्रमाणपत्र संकेतस्थळाच्या मूळ सर्वरवरती होस्ट केलेली असते. 

SSL काय आहे?
SSL (secure socket layer) ज्याला सामान्यतःटीएलएस(TLS= Transport Layer security) प्रोटोकॉल म्हणतात,इंटरनेट रहदारी एन्क्रिप्ट करणे आणि सर्व्हर ओळखण्यासाठी हा एक प्रोटोकॉल आहे.एसएसएल प्रमाणपत्रे वेबसाइटना HTTP वरून HTTPS वर जाण्यास सक्षम करते जे अधिक सुरक्षित आहे.ईकॉम संकेतस्थळ यामध्ये ssl प्रमाणपत्र असणे गरजेचे असते.कारण आपण यावरती आपली गोपनीय माहिती अद्यावत करत असतो.

SSL प्रमाणपत्र कुठे मिळते?
संकेतस्थळ सर्वर वरती होस्ट करत असतांना godaddy,hostgear आदि होस्टींग कंपन्या SSL प्रमाणपत्र ग्राहकाला देतात.