जंगल म्हणजेच पृथ्वीचे अस्तित्व.झाडे,झुडपे,गवत,औषधी वनस्पती यापासून जंगले बनलेली आहेत.जंगलामध्ये कोट्यावधी झाडांच्या,  प्राण्यांच्या,पक्षांच्या प्रजाती आहेत.जंगले मानवाला जगण्यासाठी व समृद्ध होण्यासाठी अनेक स्त्रोत पुरवते.

जंगलाचे महत्त्व का आहे हे आपण समजून घेऊया,जंगलामध्ये हत्ती,वाघ,सिंह,चित्ता,गेंडा,लांडगे इत्यादी अनेक वन्य प्राण्यांची घरे आहेत आणि जर ते जंगलाशिवाय जगू लागले तर ते नामशेष होतील.ह्या सर्व प्राण्यांचे निसर्गात अन्नसाखळी मध्ये विशेष महत्व आहे.मांसाहारी किंवा शाकाहारी प्राणी असोत की सर्वभक्षी प्रत्येक प्राणी हा अन्न साखळी टिकवून ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावत असतो.

जंगले माणसांना लाकूड,पोषकद्रव्ये,अन्न,इंधन आणि बरेच काही उपलब्ध करून देतात.पूर्वी मानव जगण्यासाठी पूर्णपणे जंगलावर अवलंबून होते.परंतु जसजसे मनुष्य विकसित झाला तसतसे शेतीसाठी वनक्षेत्र तोडून टाकणे,प्राणी मारणे आणि शहरे विस्तृत करण्यासाठी जंगलतोड मोहीम राबवणे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणासाठी माणूस वनजमिनी हस्तगत करू लागला या सर्व मानवजातीच्या लोभामुळे आणि बेजबाबदारपणामुळे जगातील वनक्षेत्र कमी झाले आणि याचा परिणाम म्हणून झाडांच्या संख्येत घट झाली आहे आणि एकीकडे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड,नायट्रोजन व इतर विषारी वायूंचे उत्सर्जन वाढत आहे.जंगलतोडीमुळे जागतिक तापमानवाढ निर्माण झाली.  

माणसाला जंगलाची संसाधने कशी वापरायची हे शिकण्याची गरज आहे आणि जंगलाचे रक्षण करणे काळाची गरज आहे तरच पर्यावरण संतुलन अभाधित राहील.