सातारा-महाराष्ट्रात जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्क सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना पुरोगामी जननी मानली जाते.त्यांनी पुण्यात प्रथम मुलींच्या शाळा सुरू केल्या. शिवाय, त्यांनी जाती आणि लिंगांवर आधारित लोकांशी असलेला भेदभाव बंद करण्याचे काम केले.समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांना महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीची समाजसुधारक मानले जाते.सावित्रीबाई यांनी केवळ महिलांच्या हक्कांसाठीच काम केले नाही तर स्त्री-बालहत्या थांबवण्यासाठी प्रभावी पाऊले देखील उचलली.नवजात मुलींसाठी एक निवारा घर देखील सुरु केले. त्यांचे पती ज्योतिबा फुले समाजसुधारक होते.त्यांना महात्मा हि पदवी बहाल केली होती. महात्मा फुले आणि स्वत: सावित्रीबाईंनी स्वतःशाळेचे शिक्षण आणि व्यवस्थापन सुरू केले.महात्मा फुले यांनी सुरुवातीपासूनच त्यांना त्यांच्या कामात सहकार्य केले त्यांना बर्याच ठिकाणी वाईट अनुभव सुद्धा आलेत परंतु न डगमगता आपले समाज सुधारणेचे काम चालू ठेवले.सावित्रीबाई फुले देखील एक साहित्यिक आणि कवी होत्या.त्यांनी अनेक कविता प्रकाशित केल्या.त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा परिणाम म्हणून ती एक उत्कट स्त्रीवादी झाली.महिलांच्या हक्काच्या मुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली तसेच बालविवाह आणि विधवा विवाह विरोधात चळवळ उभा केली तसेच त्याचे प्रभोधन केले.महिला आणि शेतकरी यांच्या सुधारणेत त्यांचा मोलाचा वाटा आहे.