आरोग्य या शब्दाचा अर्थ म्हणजे मानसिकदृष्ट्या चांगले राहणे म्हणजेच निरोगी आणि तंदुरुस्त राहणे.निरोगी जीवनशैली तंदुरुस्त राहणे हे सर्व काही घडते नियमित व्यायामामुळे.रोग होण्याचा धोका कमी करण्यास आणि वजन कमी करण्यास नियमित व्यायामाची मदत होत असते तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यास व्यायामाची मदत होते.मानसिक ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी व्यायाम हा एक चांगला मार्ग आहे आणि यामुळे आपली प्रगती वाढू शकते.एखाद्याचे वय कितीही असो,नियमित व्यायामाचा प्रत्येकाला फायदा होतो.मुलांना आयुष्यभर निरोगी सवयी टिकून राहण्यासाठी व्यायाम हा महत्वाचा आहे व्यायामामुळे स्नायूंच्या वाढीस उत्तेजन,सांधे आणि हाडे तसेच फुफ्फुस आणि हृदयाला मदत होते.मुलांना निरोगी वजन कायम राखण्यास मदत करते.व्यायामामुळे तरूण लोकांना नैराश्याची लक्षणे नियंत्रित होण्यास मदत होते.

बदलत्या जीवनशैलीत नोकरी आणि लांब प्रवास यामुळे आपली   निष्क्रियता वाढली असून यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे.नियमित व्यायामामुळे शरीरातील स्नायू,हाडांचे आरोग्य,हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती सुधारते तसेच शरीरातील चरबी कमी होते.व्यायामाची नवीन सुरवात करत असताना शरीराला दुखापती होऊ शकतात या गोष्टी टाळण्यासाठी  तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यासाठी संतुलित आहार  घेणे महत्वाचे आहे.

निरोगी आणि तंदुरुस्त व्यक्तीला तीव्र आजारांचा धोका कमी असतो.व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो.रोग प्रतिकारशक्ती वाढते.व्यायामामुळे एखाद्या व्यक्तीला जास्त वजन वाढवण्यापासून किंवा वजन कमी करण्यास म्हणजेच स्थिर वजन नियंत्रित करण्यास आणि राखण्यास मदत होते.व्यायामामुळे झोप चांगली लागते.व्यायामामुळे मेंदूची स्मरणशक्ती आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

मानवी जीवनात आरोग्य महत्वाचे आहे.आरोग्य हीच संपती आहे.त्यामुळे प्रत्येकाला थोडाफार व्यायाम करणे गरजेचे आहे तरच शरीर कार्यक्षम राहील.