मी महात्मा जोतीबा फुले माझा जन्म शेतकरी कुटुंबात सन १८२७ रोजी झाला.माझ्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले असून ते प्रामुख्याने पारंपारिक शेती व्यवसाय करत असत.मी लहान असतानाच माझ्या आईचा अकाली मृत्यू झाला होता.आमचा समाज शिक्षणापासून वंचित होता.मला शिक्षणाची खूप आवड होती.प्राथमिक शिक्षण घेत असताना मला अनेक अडचणीचा सामना करावा लागला.सामाजिक परिस्थितीमुळे मला पुढील शिक्षण घेता आले नाही.मी प्राथमिक शाळेनंतर शेतीविषयक उद्योगधंद्यात मदत करण्यास सुरवात केली.मी परत १८४२ साली पुणे येथे माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला.मी लहान असतानाच वडिलांनी माझे लग्न केले.पत्नीचे नाव सावित्रीबाई होते.

समाजातील जातीव्यवस्था,अज्ञान,आर्थिक टंचाई या सर्व बाबी शिक्षणाचा अभाव असल्याने घडत होत्या.हे लक्षात आल्यामुळे मी प्रथम माझ्या पत्नीला घरी शिकवण्याचा प्रयत्न केला.कारण मुलींना शाळेत प्रवेश दिला जात नसे.

माझी पत्नी सावित्रीबाई हि सुद्धा हुशार असल्याने तिला सामाजिक परिस्थितीची जाणीव होती.ति मला सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करत होती.आम्ही दोघांनी शिक्षण हा पाया समोर ठेऊन पुणे इथे सन १८४८ साली मुलींची शाळा स्थापन केली.परंतु या कामासाठी आम्हाला बराच त्रास देण्यात आला पण आम्ही आमच्या कामासाठी ठाम राहिलो.अस्पृश्य मुलांसाठी सन १८५२ रोजी शाळा स्थापना केली.निम्न जातीचे शोषण,अन्याय तसेच सामजिक विषमता घालवण्यासाठी तसेच शेवटपर्यंत शिक्षण देण्यासाठी सन १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.सावित्रीबाईनी स्त्री विभागाचा पुढाकार घेतला होता.सामाजिक न्यायाची पायाभरणी सत्यशोधक समाजा मार्फत झाली होती.विधवा पुनर्विवाह,बालहत्या प्रथिबंध यासाठीचे सामजिक प्रभोधन आम्ही दोघांनी केले.शेतकरी कुणबी यांच्यावर होणाऱ्या अन्यायावरती मी शेतकऱ्यांचा आसूडनावाचे पुस्तक लिहिले.स्त्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह,कामगार,शेतकरी यांच्या सामाजिक सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नामुळे जनतेने मला महात्माहि पदवी दिली.