चिन तेंडूलकर यांची ओळख क्रिकेटमधील विक्रमादित्य म्हणून प्रसिद्ध आहे.भारतीय आणि विश्वस्तरीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत सचिन विषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया.

सचिनचा जन्म सामान्य कुटुंबात असून मुंबई येथे  त्याचे  बालपण गेले असून सचिनची शालेय जीवनात क्रिकेटची आवड आणि प्रगती पाहून त्याला महान मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करत सचिनचा पाया मजबूत आणि सक्षम केला.सचिनने पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला असून तो कसोटी सामना होता.तसेच त्याने एकदिवशीय पहिला सामना सुद्धा पाकिस्तान विरुद्ध  खेळला  आहे.सचिन ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघातर्फे पुढील प्रमाणे योगदान दिले आहे

एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत सचिन ने ४६३ सामने खेळला असून १८४२६ धावा व ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांची नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट स्पर्धेत सचिन ने २०० कसोटी सामने खेळला असून १५९२१  धावा  व ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांची नोंद आहे.

फलंदाजी व्यतिरिक्त सचिन ने गोलंदाजी केली असून कसोटी सामन्यात ४६ विकेटा आणि एकदिवशीय सामन्यात १५४ विकेटा घेतल्या आहेत.

सचिन भारतीय संघातर्फे सहा विश्वचषक खेळला असून सन २००३ विश्वचषक आणि २०११ विश्वचषक अंतिम सामना खेळला आहे. 

भारतीय संघाने २०११ चा विश्वचषक जिंकला असून त्यामध्ये सचिनचा मोलाचा वाट आहे.

सचिनला अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यापैकी भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न सचिनला प्रदान करण्यात आला आहे.

सचिन ची १० नंबरची जर्शी प्रसिद्ध होती.सचिनने आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमधून २०१२ रोजी तसेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून २०१३ रोजी निवृत्ती घेतली.